सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

कृष्ण मुरारी....



कृष्ण मुरारी होईन मी
तू प्रीतबावरी मीरा हो
महादेवाच्या माथ्यावरची
गंगेची तू धारा हो ....

कृष्ण सावळा होईन मी
तू अल्लड अवखळ राधा हो
मिठीत शिरता सांजसकाळी
फुलता फुलता मुग्धा हो....

चक्रपाणी होईन मी
तू गीतेमधली वाणी हो
पहाठलेल्या स्वप्नामधली
तू एकटी राणी हो....

Picture of Lord Krishna Eight Avatar of Vishnu


मीरा हो तू राधा हो तू
हो गीतेची वाणी
तुझ्याचसाठी भोगीन मी
पुन्हा मानवी योनी....

तुझ्याचसाठी पुन्हा एकदा
जन्म येथला घेईन मी
तुझ्या दुःखाच्या प्यालामधला
थेंब सुखाचा होईन मी....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा