सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

माझी कविता : प्रिया...


कासावीस होते आहे मी 
तुझ्या काही शब्दांसाठी .......
माझ्याच चुकांसाठी 
मलाच आहे शिक्षा हि......
फक्त तुझीच आहे मी 
हे  कसे पटवून देऊ मी......
तुझ्याचसाठी  झुरते आहे मी
क्षण  क्षण  मरते आहे   मी......
बोल  ना   रे  एकदाच  
किंतु  नको ठेऊ कुठलाच......  
नाही समजू शकले मी तुला
येतो आहे स्वतःचाच  राग मला.....
जाऊ दे नको बोलू
होऊ दे सवय तुला याचीही......
मला दूर लोटल्यावर
कळेल मलाच किंमत याची.......
तू नको ठेऊ खंत याची
पुसून टाक हि आठवण कालची......

माझी कविता : असं जगावं कि...


असं जग कि तुझं असणं,
एखाद्यासाठी आयुष्य होईल  ...
असं जग कि तुझं मरणं,
एखाद्याला कठीण होईल...
असं हस कि तुझं हसण,
एखाद्यासाठी संजीवनी देईल...
असं रड कि तुझं रडण,
एखाद्याच हृदय कातर करेल...
असं बोल कि तुझं बोलण,
एखाद्याला साखरेपेक्षा गोड वाटेल...
अशी नाती जोड कि,तुझं नात  
समोरच्याला तोडन कठीण होईल...
असं लढ कि,  तुझा लढा
इतिहासात अमर होईल...
असं विश्वास सम्पादन कर कि
अविश्वासाच नावच लोपेल...
अशी गर्जना कर कि 
सिंह तुला डरकाळीने  मुजरा करेल...
असं कोमल बन कि,
गुलाब देखील तुला पाहून लाजेल... 
अश्या उंचीवर जा कि,
हिमालयही तुला  ठेंगणा होईल...
असं  मरण याव कि,
जाताना स्मृति हृदयात ठेवता येतील
आणि.. असं  जगावं  की ,
आपल आयुष्य एखाद्याला जगायला शिकवेल !!

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

माझी कविता : मी ही अशी...

मी ही अशी...
स्त्री म्हणून जन्मले
देवाच्या या देणगीला
पुरेपूर जागले !

मी ही अशी...
कोमल काया म्हणून वाढले
आईच्या कुशीत
पान्ह्याला जागले  !

मी ही अशी...
वयातही आले
स्वतःच्या पायांवर
खोल-खोल रुतले   !

मी ही अशी...
बंधनात तृप्त झाले
नव्या नात्यांमधेही
स्वतःलाच शोधले   !

मी ही अशी ...
मातृत्वाला उरी घेतले
पंख मायेचे
पांघरून उरले   !

मी ही  अशी...
कर्तुत्वाने न्हाले
या पंखासाठी
आभाळही विस्तारले   !

मी ही अशी...
स्त्री म्हणून अभिमानाने जगले
जीवनाच्या या नदीत
स्त्री म्हणूनच लोप पावले   !

- राधिका

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

कृष्ण मुरारी....



कृष्ण मुरारी होईन मी
तू प्रीतबावरी मीरा हो
महादेवाच्या माथ्यावरची
गंगेची तू धारा हो ....

कृष्ण सावळा होईन मी
तू अल्लड अवखळ राधा हो
मिठीत शिरता सांजसकाळी
फुलता फुलता मुग्धा हो....

चक्रपाणी होईन मी
तू गीतेमधली वाणी हो
पहाठलेल्या स्वप्नामधली
तू एकटी राणी हो....

Picture of Lord Krishna Eight Avatar of Vishnu


मीरा हो तू राधा हो तू
हो गीतेची वाणी
तुझ्याचसाठी भोगीन मी
पुन्हा मानवी योनी....

तुझ्याचसाठी पुन्हा एकदा
जन्म येथला घेईन मी
तुझ्या दुःखाच्या प्यालामधला
थेंब सुखाचा होईन मी....

मधुराष्टकम

 

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं I
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

वचनं  मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं  I
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

वेणुर्मधुरो रेनुर्मधर: पानिर्मधुर: पादौ मधुरौ I
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं I
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं I
वामितं मधुरं शमीतं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा विची मधूरा I
सलीलं मधुरं कमलं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

गोपी मधुरा लीला  मधुरा युक्तं मधुरं भुक्तं  मधुरं I
दृष्टं  मधुरं शिष्टं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

गोपा मधुरा  गावो मधुरा यष्टीर्मधुरा सृष्टीर्मधुरा I
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुरापतेरखिलमं  मधुरं I

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

मी राधिका...

राधिका......ग
श्याम तुझाच मी,

अवखळ अल्लड प्रीत ही माझी,
तुझ्याच साठी वेचली सारी....



नमस्कार ! मी सौ. राधिका सचिन कदम. आज पर्यंत खूप ब्लॉग्स  वाचले , अनुभवले आणि भावले हि. आणि आज मी स्वतःच  हा ब्लॉग  लिहित  आहे. खूप आनंद होत आहे कारण मलाही स्वतःच एक व्यासपीठ  मिळाल आहे. वाटतयं  कि सभागृहात गच्च भरलेल्या प्रेक्षकांसमोर मी उभी आहे आणि माझा आजपर्यंतचा प्रवास अनुभवत आहे.तुम्हा या प्रेक्षक रुपी ब्लोग्गेर्सच्या अभिप्रायाची आशा करते.

सौ. राधिका सचिन कदम ( radhikadam : radhika.sachin33@gmail.com)